गोरखपुर : वृत्तसंस्था – या वॅलेंटाईन वीकमध्ये युपीच्या गोरखपूरमधून एक वेगळीच घटना समोर आली असून अनोळखी नंबरवरून एका महिलेसोबत बोलणे झाले असता खूपच पुढे जात तिला समोरून बोलणाऱ्या मुलाने फोनवरच बोलताना प्रपोज डेला आपल्या प्रेम व्यक्त केले आहे. दोघांनीही आपापली नावे चुकीची सांगत प्रॉमिस डेला पण आपल्या प्रेयसीला भेटायला बोलावले होते. तिकडे जेव्हा दोघे एकमेकांसमोर आले तेव्हा तरुण आश्चर्यचकित झाला.
खोराबार येथे २० वर्षीय एका तरुणाने सहजच एका दिवशी एका अनोळखी नंबरवर फोन केला. त्यावर समोरून एका महिलेचा आवाज आला. दोघेजण अनेक दिवस फोनवर एकमेकांशी बोलत होते. तसेच त्यांनी आपली नावे खोटी सांगितली होती. दरम्यान वॅलेंटाईन वीक सुरु झाला. तसेच प्रपोज डेला त्याने महिले फोनवर आपले प्रेम व्यक्त केले ज्याचा महिलेनेही स्वीकार केला. तरूणाने महिलेला आपले मानले होते आणि आता तिला भेटण्यासाठी खूप आतुर झाला होता. दोघांनी प्रॉमिस डेला भेटण्याचा निर्णय घेतल्यावर तरुण मस्तपणे तयार होत त्याच्या हातात गुलाबाची फुलं घेऊन ठरवलेल्या जागी महिलेला भेटायला गेला. अचानक त्याची मोठी आईसुद्धा तिथे पोचली. तिला बघून तो इकडे-तिकडे लपू लागला.
जेव्हा त्याने आपल्या मैत्रिणीला फोन केला तेव्हा त्याच्या मोठ्या आईचाच फोन वाजला. आता दोघेही एकमेकांसमोर होते. या तरुणाला विश्वासच बसत नव्हता की, तो ज्या व्यक्तीशी आपण प्रेयसी म्हणून बोलत होतो ती त्याचीच मोठी आई होती. एकमेकांना सत्य कळताच दोघांनाही धक्का बसला. महिलेने ताबडतोब परत येऊन कोणालाही काही कळण्यापूर्वीच तिने महिला पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार दिली. या दोघांमध्ये फोनवर संभाषण चालू होते. या महिलेने छेडछाड केल्याची तक्रार दिली आहे. या युवकाविरूद्ध शांतिभंग केल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.