बहुजननामा ऑनलाइन – पोरीला अन प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी पोरं काहीही करु शकतात. मात्र, अनेकदा याचे परिणाम मात्र भलतेच होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुलासाठी तुम्हालाही वाईट वाटणार आहे.
गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी मुलाने भाड्याने सर्वात महागडी मर्सिडिझ गाडी घेतली होती. गाडीची किंमत भारतात 1.5 ते 2 कोटीपर्यंत आहे. गर्लफ्रेंडला भेटायला जात असताना रस्त्याच या मुलाकडून गाडीचा अपघात झाला. गाडी रस्त्यावरच्या खांबाला धडकली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघात झाल्यानंतर हा मुलगा गाडी सोडून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतला असता मुलाने गाडी धडकल्याचे समोर आले. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकर्यांनी विविध रिप्लाय दिले आहेत. काहींनी मुलाचे नशीब खूप वाईट असल्याचे म्हंटले आहे तर, काहींनी मुलींचाच नादच वाईट अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत.