मुंबई बहुजननामा : अश्लील फोटोस दाखवून बॉस च्या बायकोला ब्लॅकमेल करणाऱ्या २७ वर्षीय कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा मूळचा गुजरात मधील आहे. बॉस च्या पत्नीसोबत या आरोपीचे प्रेमसंबंध होते. आपल्याबद्दल तुझ्या नवऱ्याला सगळं काही सांगेल , सतत अशी धमकी देऊन आपल्या बॉस च्या पत्नीकडून आरोपीने २.२५ लाख रुपये उकळले. तसेच आपले आक्षेपार्ह फोटोस देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले असल्याची तक्रार महिलेने शुक्रवारी नोंदवली, आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीला याआधीदेखील बलात्काराच्या केस मध्ये अटक करण्यात आली होती. जमीन मिळाल्यांनतर आपली ओळख बदलत तो मुंबई मध्ये दाखल झाला आणि तक्रार दाखल केलेल्या महिलेच्या पतीच्या कंपनीत कामाला लागला. अशी माहिती पोलिसांनी दिली.
“तुझे अश्लील फोटोस पोस्ट करून , तुझ्या नवऱ्याला दाखवेल,” अशी धमकी आरोपी गेली कित्येक महिन्यांपासून महिलेस देत होता. तसेच माझी मैत्री स्वीकारली नाहीस तर स्वतःचा जिव देईल अशी धमकी देऊन , बळजबरी मैत्री करण्यास भाग पाडले. असे महिलेने तक्रारी मध्ये नोंदविले आहे. पहिल्यापासून तो महिलेचा पाठलाग करायचा , आणि माझे किती प्रेम आहे हे पटवून द्यायचा. त्यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटोस पोस्ट करण्याची धमकी दिली, आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.