नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणाला कशी लॉटरी लागेल? हे सांगता येत नाही. याची प्रचिती एका घटनेतून समोर आली आहे. कारण, एकाचं नशिब हे एका दगडानं चमकवलं आहे. ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण, हे आश्चर्यकारक आहे. खोदकाम करताना त्याला ‘त्या’प्रकारचा दगड आढळला आहे. सॅनिनिऊ लॅजेर असे त्या नशिब आजमाविणार्या गृहस्थाचे नाव आहे. लॅजेरला सापडलेला दगड दुर्मिळ असून त्याला जेमस्टोन म्हणतात.
खोदकाम करत असताना लॅजेरला अनोखा दगड सापडला आहे. पण, हाच दगड विकून लॅजेरने सुमारे 14.7 कोटी रुपये कमावले आहेत. काही महिन्यांपूर्वी लॅजेरला असाच एक दगड लागला होता. लॅजेरने तो दगड विकून सुमाये 23.5 कोटी रुपये मिळवले होते.
याबाबतचे वृत्त डेली मेलने दिले आहे, सॅनिनिऊ लॅजेर हा दगडामुळे दोनवेळा कोट्याधीश झाला आहे. लॅजेर हा टांझानियाचा इथला रहिवासी आहे. देश केनिया आणि झिंबाम्वेनजीक टांझानिया हा स्थित आहे. त्याठिकाणच्या खाणीत खोदकाम करण्याचे काम लॅजेर करत आहे.
लॅजेरला मिळालेल्या दगडाचे वजन 6.3 किलो होते. तर, त्याने एका समारंभात हा दगड त्यांनी सुमारे 14.7 कोटींना विकला असून हा समारंभ शेकडो लोकांच्या पार पडला होता. सॅनिनिऊ लॅजेरने तीन विवाह केले असून त्याला तीस मुले आहेत.
या मिळालेल्या पैशाचे तो काय करणार असे लॅजेरला विचारले असता तो म्हणाला की, या पैशातून शाळा आणि शॉपिंग मॉल्स उभारणार आहे. तसेच इतके पैसे मिळाल्यानंतरही माझं राहणीमान बदलणार नाही. 2000 गाईंची देखभाल करण्याचे काम सुरू ठेवणार आहे.