नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – पश्चिमबंगालमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात वादग्रस्त ट्विट केले आहे. पश्चिम बंगालमधील अखेरच्या टप्प्यातील मतदान बाकी अजून बाकी आहे . योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी यांची तुलना ISIS च्या म्होरक्याशी केली आहे.
योगी यांनी आपल्या अधिकृत ट्विटवरून म्हटले की, बगदादी यांच्याकडून प्रेरणा घेऊन ममता ‘बगदीदी’ होण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, बगदीदी होण्याचं तुमचं स्वप्न भारताचे सपूत मतदानाच्या माध्यमातून उध्वस्त करतील, असंही योगींनी म्हंटले आहे.
भाजपला घाबरून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधील सभांना परवानगी नाकारत आहेत .मात्र लक्षात ठेवा बंगाल भारताचा अविभाज्य घटक आहे. बगदादीकडून प्रेरणा घेऊन बगदीदी होण्याचं तुमच स्वप्न भारताचे सच्चे सपूत कधीही पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा योगी यांनी ममता यांना दिला.
याआधी बंगालमध्ये सभा घेण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना मज्जाव करण्यात आला होता. मात्र त्यांनंतरही त्यांनी हवडा येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी ममता यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमित शाह यांच्या रोडशोवेळी झालेल्या प्रकरणावरून ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीची एक्सपायरी डेट निश्चित झाल्याचे योगींनी म्हटले.
भाजपा से भयभीत ममता बंगाल में सभाओं के मंच तोड़कर, मजदूरों को पीटकर,रैलियां रद्द करवाकर बंगाल को क्या बनाना चाहती हैं?
याद रखिये,बंगाल भारत का अभिन्न अंग है,
बगदादी से प्रभावित होकर "बगदीदी" बनने का आपका सपना भारत माँ के सच्चे सपूत वोट की चोट से तोड़कर रहेंगे।
जय हिंद।
जय भारत।— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 15, 2019