दिल्ली वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील झालेल्या वादामुळे पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलच तापलं आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हुकुमशहा सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेत अशी टीका सुप्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉय याने केली आहे, ममता दीदींची ही ‘दीदीगिरी’ जास्त दिवस चालणार नाही असा टोलाही विवेक ओबेरॉयने केली आहे.
कोलकात्यात भाजप पक्षाध्यक्ष अमित शहांच्या रोडशो दरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामाारी झाली. यानंतर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना मध्यरात्री अटकही करण्यात आली.गेले काही दिवस बंगालमध्ये चालू असलेल्या राजकीय धुमश्चक्रीवर पहिल्यांदाच कोणत्यातरी कलाकाराने भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका वठवणाऱ्या विवेक ओबेरॉयने ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
‘मला कळत नाही दीदींसारखे आदरणीय व्यक्तिमत्त्व सद्दाम हुसैनप्रमाणे का वागत आहे. खरं तर लोकशाही खतरे में है अशी मागणी करणाऱ्या ममता दीदींमुळेच लोकशाही धोक्यात आली असल्याचे ओबेरॉय यांनी म्हंटले आहे.
I can’t understand why a respected lady like Didi is behaving like Saddam Hussain! Ironically, democracy is under threat and in danger by Dictator Didi herself. First #PriyankaSharma & now #TajinderBagga. यह दीदीगिरी नही चलेगी ! #SaveBengalSaveDemocracy #FreeTajinderBagga pic.twitter.com/oRq596aljH
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 15, 2019