पुणे : बहुजननामा ऑनलाइन – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या (Indian National Congress Party) अध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (Maharashtra Pradesh Congress Committee) उपाध्यक्ष मोहन जोशी (Vice President Mohan Joshi) यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘पक्ष संघटनेची व्यक्ती’ अशी ओळख असणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी ब्लॉक अध्यक्ष ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष (Congress President) अशी केलेली वाटचाल सर्वच कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल हे निश्चित, असे मोहन जोशी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संसदीय राजकारणाचा 50 वर्षांहून अधिक अनुभव त्यांना आहे.तसेच काँग्रेस पक्षाच्या विविध पदांवरही त्यांनी काम केले आहे. काँग्रेस पक्ष संघटन अधिक खोलवर रुजवत व अधिक बळकट करीत धर्माच्या आधारे समाजात फूट पाडणाऱ्या धर्मांध शक्तींना दूर हटवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या पुढे आहे आणि त्यात ते निश्चित यशस्वी होतील असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला आहे.
मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता,
सर्वधर्म समभाव व सामाजिक समता ही उदात्त मूल्ये रुजवत काँग्रेस पक्षाचा सुवर्णकाळ निर्माण करतील.
हा देखील सर्वांना विश्वास आहे. महाराष्ट्राशी त्यांचे भावनिक नाते असून काँग्रेस पक्षाचे ते महाराष्ट्राचे प्रभारी अनेक
वर्षे होते. काँग्रेस पक्षाच्या संसदीय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे अनुभवी मार्गदर्शन आणि
युवा नेते खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांची जोशपूर्ण साथ त्यांना लाभेल आणि सर्वांना
एकत्रित घेउन अधिक मजबूत काँग्रेस पक्ष देशात परिवर्तनासाठी सिद्ध होईल हा विश्वास व्यक्त करतो,
असे मोहन जोशी यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Mallikarjun Kharge | Mallikarjun Kharge will create the golden age of Congress party, Mohan Joshi wishes Kharge
हे देखील वाचा :
High Blood Pressure | ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकते का सैंधव मीठ? जाणून घ्या आणखी घरगुती उपाय