Malhar Peth Police Station | मल्हारपेठ पोलिसांनी चोरी झालेले 3 लाख 73 हजार रुपये किंमतीचे 17 मोबाईल केले हस्तगत

पाटण: Malhar Peth Police Station | आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत जीव की प्राण असा झाला आहे असा हा मोबाईल जेव्हा गहाळ किंवा चोरीला जातो, तेव्हा त्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना त्याच्या त्यालाच माहीत असतात. अशा ३ लाख ७३ हजार रुपये किमतीचे मोबाईल मल्हारपेठ पोलिसांनी अथक प्रयत्न करून चोरट्यांकडून मिळवून ते नागरिकांना परत केले आहेत. (Mobile Theft)
मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछाले (API Chetan Machale) यांनी नागरिकांचे हरविलेलया मोबाईलचा शोध घेण्यासाठी मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सूचना दिलेल्या होत्या.
त्याअनुषंगाने पथकातील पोलीस स्टाफने सी.ई.आय.आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीच्या आधारे हरवलेले मोबाईल बाबतची माहिती प्राप्त करुन अथक परीश्रम करुन सदरची मोहीम राबविल्याने मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरीकांचे गहाळ / चोरी झालेले एकूण ३ लाख ७३ हजार रुपये किमतीचे एकूण १७ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे.
गुरुवार (दि.१) रोजी चेतन मछले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारपेठ पोलीस ठाणे याच्या हस्ते मूळ तक्रारदारांना त्यांच्या मोबाईलचे वाटप करण्यात आले. सदरची मोहीम समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा, आंचल दलाल अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, सविता गर्जे पोलीस उपअधिक्षक ,पाटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख (IPS Sameer Shaikh), आंचल दलाल (Aanchal Dalal) अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, सविता गर्जे (DySP Savita Garje), पोलीस उपअधिक्षक पाटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक नितेश पोटे (PSI Nitesh Pote), पोलीस उपनिरीक्षक रामराव वेताळ (PSI Ramrao Vetal), पोलीस कॉन्स्टेबल सिध्दनाथ शेडगे, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी केलेली आहे.
Comments are closed.