बहुजननामा ऑनलाईन – उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे बऱ्याच समस्या उद्भवतात. यामुळे चेहऱ्यावर मुरूम, पुरळ दिसून येतात.आपल्याला ही समस्या असेल तर आपण घरगुती फेसपॅक बनवू शकता….
१) मुलतानी मातीपासून बनवलेले फेसपॅक-
मुलतानी माती आणि गुलाबपाणी हे त्वचेला थंड ठेवण्यास मदत करतात. यासाठी दोन्ही समप्रमाणात घेऊन मिश्रण तयार करा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून १५ ते २० मिनिटे तसेच ठेवावे. नंतर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा.मुलतानी माती चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करते व तसेच त्वचेला मऊ करते.
२)बेसन आणि काकडीपासून तयार केलेले फेसपॅक-
काकडीचा रस हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्वचा ताजी ठेवण्यासाठी एक चमचा काकडीचा रसात चिमूटभर हळद आणि बेसन पीठ मिसळा. बेसन पिठाचा वापर आपण अनेक काळापासून करत आलो आहोत. हे त्वचेला मॉइश्चरायझिंग करून चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करण्यास मदत करते.
३)अंड्यातील पांढरा भाग आणि मध यापासून तयार केलेला फेसपॅक-
अंड्यातील पांढरा भाग घेऊन त्यात एक चमचा मध घाला आणि दहा मिनिटे तसेच सोडा.अंड्यातील पांढरा भाग व्हाइट आणि ब्लॅकहेड्स कमी करून त्वचा चमकदार करण्यासाठी फायदेशीर आहे. मधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात हे त्वचेला मॉइस्चराइझ करण्यात उपयुक्त आहे.
४)फळांपासून तयार केलेला फेसपॅक-
चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी पपई आणि स्ट्रॉबेरी बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळा.आणि हे पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून चेहरा धुवून टाका.
५) दहीपासून बनवलेले फेसपॅक-
मोठा चमचा दही घेऊन त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करून घ्या आणि ते मिश्रण चेहर्यावर लावा. ३० मिनिटांनंतर हे मिश्रण धुवून टाका. त्यात साइट्रिक ॲसिड, एक्सफोलीएटिंग गुणधर्म आणि प्रोबियटिक्स आहेत जे त्वचा मऊ आणि तेल मुक्त ठेवण्यास मदत करतात.