पौड : बहुजननामा ऑनलाईन- जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक गावातील दलित वस्ती सुधार योजनेसाठी देण्यात येणाऱ्या निधीचा योग्य वापर होताना दिसत नाही तसेच मुळशी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दलितवस्ती अंतर्गत येणाऱ्या कामांचा निधी पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे इतरत्र वळवू नये तसे केल्यास ग्रामस्थानच्यावतीने तीव्र आंदोलन केले करण्यात येईल ,असा इशारा मुळशी पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी दिला. सूस ग्रामपंचायतीच्या वतीने ६२ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणा-या बुद्धविहार समाजमंदिराचा भूमिपूजन समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
ग्रामपंचायतीच्या वतीने समाजकल्याण अंतर्गत येणा-या रकमेमधून वरील काम हाती घेण्यात आले असल्याचे सूसचे सरपंच अपूर्वा निकाळजे यांनी सांगितले. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच समाजातील तळागाळातील लोकांसाठी आम्ही काम करत असून सूस ग्रामस्थांसाठी भरीव मदत करणार असल्याचे दीपक निकाळजे यांनी सांगितले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य विजय केदारी, मा. नगरसेवक शेखर ओव्हाळ यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अपूर्वा निकाळजे यांनी केले.सूत्रसंचालन अॅड.तायडे यांनी केले
याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख विशाल पवार, रा.स.पा.तालुका अध्यक्ष अतुल सुतार, महिला तालुका संघटिका ज्योती चांदेरे, सूसगावच्या सरपंच अपूर्वा निकाळजे उपसरपंच गजानन चांदेरे, मा. उपसरपंच सचिन चांदेरे,शुभांगी ससार, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चांदेरे, गणेश साळुंके,बाळू निकाळजे, ग्रामपंचायत सदस्या दीपाली पारखी, दिशा ससार,सीमा निकाळजे, मा.सरपंच नारायण चांदेरे,मीरा देवकर, मा.उपसरपंच मीना चांदेरे, मा. चेअरमन दत्तोबा चांदेरे,नवनाथ चांदेरे, रोहिदास चांदेरे, बाळासाहेब भोते,सतीश चांदेरे, शाखाप्रमुख वाल्मीक चांदेरे, महिला आघाडी शाखाप्रमुख शांताबाई चांदेरे, सोमनाथ कोळेकर, अमित निकाळजे, शंकर चांदेरे, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.