नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात इंडियन कॉऊसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोना टेस्टच्या नियमात मोठे बदल केले आहेत. प्रवासी मजूर, रुग्णालयात असलेले कोरोना रुग्ण आणि फ्रंट लाईनवर काम करणार्या लोकांच्या तपासणीसाठीच्या नियमात बदल करण्यात आले आहेत.
मागील १४ दिवसा आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्या आणि संभाव्य लक्षणे जाणविणार्या प्रत्येक प्रवाशांची चाचणी
प्रयोगशाळेत संशयित पॉझिटिव्ह आल्यास संपर्कात आलेल्या आणि लक्षणे आढळणाºया व्यक्तीचीही चाचणी
चाचण्यांमध्ये आरोग्य कर्मचार्यांचाही समावेश
कंटेन्मेंट झोनमध्ये असणार्या आरोग्य आणि इतर कर्मचार्यांमध्ये प्राथमिक लक्षणे आढळल्यास सर्वांची चाचणी
श्वसन संस्थेचा संसर्ग असलेल्या सर्व रुणांची चाचणी
संक्रमितांच्या संपर्कात असलेल्या सर्वांची चाचणी
रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या आणि प्राथमिक लक्षणे असलेल्या सर्व रुग्णांची चाचणी
परतलेले प्रवासी, स्थलांतरितांना ताप आणि अन्य प्राथमिक लक्षणे आढळल्यास ७ दिवसाच्या आत त्यांची चाचणी
देशात १ लाखांहून अधिक कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.