Mahim Assembly Election 2024 | अमित ठाकरेंविरोधात मुख्यमंत्री शिंदेंचा शिलेदार लढणार; म्हणाले – ‘उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही’

मुंबई: Mahim Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासाठी त्यांनी माहिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मदत केली होती. त्यामुळे आता महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान भारतीय जनता पक्षाने आधीच ते अमित ठाकरे यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यास आग्रही आहेत. मात्र शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) मात्र धनुष्यबाणावरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. निवडणुकीतून माघार घेणार नाहीत, असे त्यांनी आजच स्पष्ट केले आहे.
माध्यमांशी बोलताना सदा सरवणकर म्हणाले,” ज्याचा एकही आमदार नाही त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे सांगणे किती हास्यास्पद आहे तुम्हीच पाहा. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात स्पष्ट केलेय की ते महायुतीच्या उमेदवाराचाच प्रचार करणार आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. कारण पक्षाने मला एबी फॉर्म दिलेला आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी अर्ज भरलेला आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे”, अशी भूमिका सदा सरवणकर यांनी मांडली आहे.
Comments are closed.