Mahayuti-Shivsena-BJP | मुख्यमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात जुंपली; महायुतीत वाद?

eknath-shinde-devendra-fadnavis

मुंबई : Mahayuti-Shivsena-BJP | राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सुरु केलेली आहे. यंदा निवडणुकांना सामोरे जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर न करता निवडणुका लढविण्याचे महायुतीने ठरवलेले असताना पुण्यात पार पडलेल्या भाजपच्या महाअधिवेशनात (BJP Convention In Pune) राज्याच्या नेतृत्वाला घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सूचक वक्तव्य केले होते. आगामी विधानसभा निवडणुकांबाबत बोलताना अमित शहा म्हणाले, ‘महायुती सरकार (Mahayuti Govt) प्रचंड बहुमताने सत्तेत येणार हे मला स्पष्ट दिसत आहे. भाजपच्या नेतृत्त्वातच महायुतीचे सरकार असणार’ असे अमित शहा यांनी स्पष्ट केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती.

विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात लढविण्यात येणार असल्याने निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला. त्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी नरेश म्हस्के यांचा दावा फेटाळला. ते म्हणाले, नरेश म्हस्के काही पक्षप्रमुख नाहीत किंवा पक्षाचे प्रमुख नेते नाहीत. महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. कोणीही मुख्यमंत्री पदाबाबत वेगवेगळी वक्तव्य करू नयेत. नरेश म्हस्के हे आता खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता जबाबदारीने वक्तव्य करायला हवीत. जेणेकरून महायुतीत विसंवाद होणार नाही, असा सल्ला दरेकर यांनी दिला आहे.