Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचे मुंबईतील जागावाटपावर शिक्कामोर्तब; भाजपाचे नेते घड्याळ चिन्हावर निवडणुकीसाठी मैदानात उतरणार?

October 19, 2024

मुंबई: Mahayuti Seat Sharing Formula | विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप (MVA Seat Sharing Formula) रेंगाळले आहे. तर महायुतीचे मुंबईतील जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) ३ जागा मिळाल्या आहेत.

अनुशक्ती नगर, वांद्रे पूर्व, शिवाजीनगर मानखुर्द हे तीन विधानसभा मतदारसंघ सोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपाला (BJP) १८ जागा सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीमध्ये मुंबईतील ३६ जागांवरील फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. मुंबईत भाजपाला १८ जागा सोडण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना मुंबईत १५ जागा लढणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आता राज्यातील जागावाटपाबाबत महायुतीमध्ये बैठकांचे सत्र सुरुच आहे. काही ठिकाणी महायुतीमध्ये भाजपाचे नेते घड्याळ चिन्हावर निवडणुकीसाठी मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात (Tasgaon Assembly) रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या विरोधात माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील (Prabhakar Patil) निवडणूक लढवणार आहेत तर वाळवा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजपाचे निशिकांत पाटील (Nishikant Patil) निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.