मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्याची तयारी सुरु झालीच आहे. मात्र सध्या सोशल नेटवर्किंग साईट ‘टिक टॉक’ वरचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. एव्हढेच नव्हे तर या व्हिडिओचा व्हॅट्सऍप स्टेट्स देखील ठेवला जातोय . हा व्हिडीओ तुम्ही देखील नक्कीच पाहिला असाल. या व्हिडीओमुळे शिवजयंतीचा माहोल तयार होत असल्याचं कळतंय.
काय आहे व्हिडीओ
महाराष्ट्रीयन पारंपरिक पोशाख घालून एक तरुणी रस्त्यावरून जाताना या व्हिडिओत दिसत आहे. येणारा प्रत्येकजण त्या मुलीसमोर मुजरा, हात जोडत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. सुरुवातीची काही सेकंद येणारा प्रत्येकजण जिजाऊंच्या लेकीसमोर मुजरा करत असल्याचं दिसतं. मात्र दुसऱ्याच क्षणाला कॅमेरा पुढे येतो आणि सर्वजण त्या तरुणीसमोर मुजरा का करतात याचा उलगडा होतो. त्या तरुणीच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असते. आणि येणारा जाणारा प्रत्येकजण त्या मूर्तीला बघून मुजरा करत असल्याचं कळतं.
तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ
हा व्हिडिओ शिवप्रेमी सर्वाधिक शेअर करत आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने हा TiKTok व्हिडिओ Whatsapp status वर सर्वाधिक शेअर केला जात आहे. या ‘ TikTok ‘ व्हिडिओवर शिवप्रेमींकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.शिवजंयतीनिमित्त शिवप्रेमी अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र यावेळेला महाराष्ट्रभर नऊवारी साडीतील या तरुणीचा ‘ TikTok ‘ व्हिडिओ प्रत्येकाच्याच ‘ Whatsapp status ‘ वर झळकताना दिसत आहे.
https://twitter.com/AkshayShitole21/status/1227982298051571712