Maharashtra Weather Update | राज्यात पुढील आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
पुणे : Maharashtra Weather Update | मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, मराठवाडा, विदर्भ, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. मात्र आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या २३ ते २८ तारखेदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंदमान बेटाच्या उत्तर भागात वादळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रात होऊ घातल्याने हा पाऊस पडू शकतो. विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
अंदमान बेटाच्या उत्तर भागात शनिवारी हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे.
Comments are closed.