दौंड : बहुजननामा ऑनलाइन – पुणे जिल्हयातील बारामती, इंदापूर, पुरंदर आणि शिरूर येथे भाजप-शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाल्यानंतर सर्वांचेच लक्ष लागलेल्या दौंड विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार आणि भाजपचे उमेदवार राहुल कूल यांचा विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे रमेश थोरात यांचा 746 मतांनी पराभव केला आहे. अत्यंत अटीतटीच्या या निवडणूकीत दोन्ही उमेदवारांनी प्रचंड ताकद लावली होती. मतमोजणी अखेर राहुल कुल यांचा विजय झाला आहे. राहुल कुल हे 746 मतांनी निवडून आले आहेत तर 917 मतदारांकडून नोटाचा वापर केला आहे.
दौंड मतदार संघ
1. किसन बबन हंडाळ (बहुजन समाज पार्टी) – 939
2. रमेश किसनराव थोरात (राष्ट्रवादी) – 102918
3. राहुल सुभाषराव कुल (भाजप) – 103664 – विजयी उमेदवार
4. अशोक किसन होले (बहुजन मुक्ती पार्टी) – 803
5. दत्तात्रय उर्फ तात्यासाहेब नामदेव ताम्हाणे (वंचित) – 2633
6. रमेश शिवाजी शितोळे (प्रहार जनशक्ती पार्टी) – 418
7. उमेश महादेव म्हेत्रे (अपक्ष) – 114
8. प्रतिक नंदकिशोर धानोकर (अपक्ष) – 80
9. प्रल्हाद दगडू महाडिक (अपक्ष) – 136
10. मोहम्मद जमिर शेख (अपक्ष)- 253
11. रमेश किसन थोरात (अपक्ष) – 462
12. लक्ष्मण नरसाप्पा अंकुश (अपक्ष) – 358
13. संजय अंबादास कांबळे (अपक्ष) – 353
14. नोटा – 917
एकुण मतदान 214048