पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Temperature | मागील काही दिवसांपासून भारतीय हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळाले. भारतातील अनेक राज्यात थंडीचा कडाका (Maharashtra Temperature) जाणवू लागला आहे. मात्र सध्या देशात काही प्रमाणात किमान तापमान स्थिरावलं आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रासह दक्षिण-पूर्व भारतात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे राज्यात थंंडी देखील वाढलेली पाहायला मिळाली. मात्र, राज्यात थंडीची लाट (Cold Wave) येण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचंं भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं आहे.
आगामी 5 दिवस भारतात कोरड्या हवामानाची शक्यता असून किमान तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. या पार्श्वभुमीवर तूर्तास पश्चिम आणि मध्य भारतात बहुतांशी ठिकाणी थंडीची लाट नाही. आगामी 5 दिवस उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात कोरडं हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. खरं तर मागील आठवडाभरापासून पुण्यातील किमान तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. सध्या पुण्यात (Pune Temperature) पारा 12 अंशावर आहे. (Maharashtra Temperature).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आज (शनिवारी) सकाळी पुणे परिसरातील (Pune Temperature) शिरूर याठिकाणी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झालीय. शिरूरमध्ये (Shirur) 12.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीय. हवेली आणि पाषाण (Haveli And Pashan) अनुक्रमे 13.7 आणि 13.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.एनडीए (NDA) (14.2), शिवाजीनगर (Shivajinagar) (V)(14.7), तळेगाव (Talegaon) (14.7), दौंड (daund) (15.4), निमगीरी (nimgiri) (14.9) आणि लवळे (lavale) याठिकाणी 17.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
Web Title :- Maharashtra Temperature | minimum temperature drop in pune Maharashtra Temperature imd report.
Google वर कसलाही शोध घेण्यासाठी उपयोगी पडतील ‘या’ 9 पद्धती, मिळेल ‘तात्काळ’ रिझल्ट