Maharashtra Sugar Factory | राज्यातील 81 साखर कारखान्यांची 39 कोटींची फसवणूक ! उसतोड टोळ्यांकडून करार न पाळल्याचा परिणाम

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Sugar Factory | उसतोडणी टोळ्या, मुकादम यांनी उसतोडणी यंत्रणेसाठी केलेले करार पाळत नसल्याने सन २००४ पासून २०२० पर्यंत राज्यातील ८१ साखर कारखान्यांची ३९ कोटी ४६ लाख ८४ हजार ३२२ रुपयांची फसवणूक झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. वाहतूकदार, मुकादम, उसतोडणी कामगारांकडून फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य उस वाहतूकदार हे मोबाइल ॲप साखर आयुक्तालयाने विकसित केले आहे. त्यामध्ये वाहतूकदार, मुकादम, उसतोडणी कामगारांची माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे ही फसवणूक टाळता येणे शक्य होणार आहे. (Maharashtra Sugar Factory)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गेल्या वर्षीच्या सन २०२१-२२ च्या हंगामात आगाऊ रक्कम देऊन करार केला आणि प्रत्यक्षात संबंधित मुकादमांनी दुसऱ्या कारखान्यांबरोबरही करार केल्याचे स्पष्ट झाले. असे २५० ते ३०० कामगार निदर्शनास आले आहेत. ॲपमध्ये सर्वच कारखान्यांनी माहिती भरल्यास कारखान्यांची होणारी फसवणूक टाळता येणे शक्य होणार आहे. उस तोडणी, गाळप प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून परिश्रम घेण्यात येत आहेत. त्याकरिता तयार करण्यात आलेल्या ॲपमध्ये शेतकरी, उसतोड कामगार, वाहतूकदार, कारखानदार यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड (IAS Shekhar Gaikwad) यांनी दिली. (Maharashtra Sugar Factory)
राज्यात दहा लाखांच्या आसपास उसतोडणी कामगार, ५५ हजार वाहन मालक आणि ५० ते ५५ हजार मुकादम कार्यरत आहेत.
त्यामध्ये २०२१-२२ करिताच्या नोंदीत माहिती पाहता ३८ हजार ९६७ वाहनधारक, दोन हजार ४० मुकादम यांनी माहिती भरली आहे.
तसेच ४१५३ लोकांनी उपयोजनाचा वापर केला असून ही संख्या चालू वर्षी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
दरवर्षी ऊस तोडणीसाठी साखर कारखाने मुकादम आणि उस तोडणी टोळी प्रमुखांना गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी उचल रक्कम देतात.
प्रत्यक्षात रक्कम घेऊनही तोडणीस टोळ्यांचा पुरवठा न होण्यामुळे कारखाने पोलिसांमध्ये गुन्हेही दाखल करत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
या ॲपमुळे एकूणच उस तोडणीच्या व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येत आहे.
राज्यात एकाचवेळी २०० साखर कारखाने सुरू असतात.
या कारखान्यांमधून वेगवेगळ्या ठिकाणी उस गाळप होत असल्यामुळे आणि प्रत्येक हंगामापूर्वी साखर कारखाने वाहतूकदारांबरोबर उसतोडणी यंत्रणेसाठी करार करतात.
अन्य कारखान्यांमध्ये देखील तेच वाहतूकदार, मुकादम, उसतोडणी कामगारांकडून मोठ्या प्रमाणावर उचल घेऊन आणि रक्कम बुडवून कारखान्यांची फसवणूक होत असल्याचे कारखान्यांच्या संकलित माहितीवरून स्पष्ट झाले आहे,
अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Sugar Factory | 39 crore fraud of 81 sugar factories in the state Consequences of non compliance by rival gangs
हे देखील वाचा :
Pune Metro | शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार, दीपक केसरकर यांची माहिती
Pune Crime | जुन्या भांडणावरुन महिलेचा खून, पुणे जिल्ह्यातील कळसमधील घटना
Comments are closed.