मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईचे माजी पोलीस प्रमुख परमबीर सिंग यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रात राजकीय कुरघोडी वाढताना दिसत आहे. आता शिवसेनेनेही अनिल देशमुख यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. निलंबित पोलीस अधिकरी सचिन वाझे यांना असे अमर्याद अधिकार कोणी दिले? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये विचारला आहे.
देशमुख योगायोगाने गृहमंत्री
सामनाचे साप्ताहिक कॉलम ‘रोखठोक’ मध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी असा सवाल केला आहे की API स्तरावरील अधिकारी सचिन वाझे यांना असे अमर्यादित अधिकार कोणी दिले? हा तपासाचा विषय आहे. राऊत यांनी लिहले आहे की, ‘पोलीस आयुक्त, गृहमंत्री हे मंत्रिमंडळातील महत्वाच्या लोकांचे प्रेमळ आणि विश्वासू होते, ते एक सहायक पोलीस निरीक्षक होतो. कोणाच्या आदेशानुसार त्यांना मुंबई पोलिसांचे अमर्यादित अधिकार देण्यात आले ही खऱ्या चौकशीची बाब आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयात बसून वसुली करीत होते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना याबद्धल माहिती नसेल काय? पुढे त्यांनी असेही लिहले आहे की, देशमुख यांना चुकून गृहमंत्रीपद मिळाले.
BJP चा निशाणा
सामना या लेखाचे वर्णन भाजपने एक नाटक असे केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, सचिन प्रकरणात शिवसेना आणि सामना यांची ही एक चाल आहे. शिवसेनेचे म्हणणे आहे की सचिन वाझे हे गृहमंत्री आणि आयुक्त यांच्यासाठी वसुली करत होते, सरकार बदनाम होत आहे. त्यांना आठवण करून द्यायचे आहे की उद्धव यांनी सचिन वाझे यांना बेकायदेशीरपणे नेमले आहे.
देशमुख यांचा राजीनामा का नाही?
भाजप नेते राम कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे देशमुखांचा राजीनामा का घेत नाहीत? देशमुखांनी तोंड उघडल्यास कोणीही तोंड दाखविण्यास सक्षम राहणार नाहीत. तिन्ही पक्ष हे याचे भागीदार आहेत.
देशमुख यांचे विधान
त्याचवेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख पुन्हा म्हणाले, ‘माझ्यावर आरोप करणाऱ्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे मी चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायधीशांद्वारे माझ्यावरील आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. जे सत्य आहे ते समोर येईल.