मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra School Reopen | राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत राज्यातील शाळा पुन्हा सुरु (Maharashtra School Reopen) करण्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सोमवारपासून शाळा सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. कोरोनाचे सर्व नियम (Corona Rules) पाळून शाळा सुरु करणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
From 24 (January) we will be reopening schools for classes 1-12th with COVID protocols; CM has agreed to our proposal: Varsha Gaikwad, Maharashtra School Education Minister pic.twitter.com/Tji4l8Y0AF
— ANI (@ANI) January 20, 2022
राज्यातील कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरु (Maharashtra School Reopen) करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पालकांची संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरु होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार आहेत.
जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरु होतील.
पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरु होणार असून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.
Web Title :- Maharashtra School Reopen | omicron covid variant maharashtra thackeray government Schools and colleges from 1st to 12th will start in the state from 24th education minister varsha gaikwad
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update