मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra School Reopen | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर (Coronavirus) राज्यातील सर्वच शाळा, काॅलेजला टाळं लागलं होतं. मात्र, गेल्या दोन महिन्यापांसून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याने राज्य सरकारने आठवीपासून ते काॅलेजपर्यंत वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, पहिली ते सातवी प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या याला देखील सरकारकडून हिरवा कंदील (Maharashtra School Reopen) मिळाला आहे. तर, राज्यातील 1 ली ते 7 वीच्या शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची (Department of Health) कोणतीही अडचण नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. येत्या 10 दिवसात याबाबत निर्णय होईल, अस देखील राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे. तसेच, आरोग्य विभागाची पहिली ते चौथी वर्ग सुरु करण्यास कोणती अडचण नसल्याचंही म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
1 ली ते 4 थी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत या पार्श्वभूमीवर त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिलं पाहिजे. 1 ली ते 4 थीचे वर्ग (maharashtra primary school reopen) सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं (Child Task Force) परवानगी द्यावी असं मत मांडलं आहे.
दरम्यान, राज्यात सध्या 700-800 रुग्ण आढळून येत आहेत.
रुग्ण होण्याचा दरही चांगला आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेऊन मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात (Maharashtra School Reopen) संमतीपत्र द्यावं.
मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं.
Web Title :- Maharashtra School Reopen | maharashtra school reopen health minister rajesh tope said health department gave green signal to start school from class first to seven final decision will take cm uddhav thackeray.
Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित वाढ पण दर 48 हजारांपेक्षा कमीच, जाणून घ्या आजचा भाव
Gautam Gambhir | माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ‘इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी