मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 7 हजार 761 नवीन कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांचे निदान झाले आहे. तर 13 हजार 452 इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात 167 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.04 टक्के इतका झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आतापर्यंत 59 लाख 65 हजार 644 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.27 टक्क्यावर गेला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 26 हजार 727 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 01 हजार 337 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 50 लाख 39 हजार 617 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 97 हजार 018 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
Maharashtra reports 7,761 new COVID cases, 13,452 patient discharges, and 167 deaths in the past 24 hours
Active cases: 1,01,337
Total discharges: 59,65,644
Death toll: 1,26,727 pic.twitter.com/57HozuELMt— ANI (@ANI) July 16, 2021
पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 283 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 268 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 11 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05.
– 229 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 483199.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3042.
– एकूण मृत्यू – 8680.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 471477.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7950.
पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 221 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 163 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एकाही मृत्यूची नोंद नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 261736.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1176.
– एकूण मृत्यू – 4318.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 256242.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4597.
Web Titel :- Maharashtra reports 7,761 new COVID cases, 13,452 patient discharges and 167 deaths in the past 24 hours
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update