Maharashtra Rains | महाराष्ट्रात आगामी 3 दिवस पाऊस कोसळणार; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात सरी

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Rains | मागील काही दिवसांपासून राज्यातील ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या (Maharashtra Rains) सरी कोसळताना पाहायला मिळाल्या. ऐन कडाक्याच्या थंडीत देखील पावसाने हजेरी लावली असल्याने थंडीचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येतेय. दरम्यान या झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी (Farmers) चिंतेत पडला आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. आजपासून (शुक्रवारी) आगामी 3 दिवस मुंबई (Mumbai) पुण्यासह (Pune) राज्यात अनेक जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्याला चिंता लागली आहे.
आज (शुक्रवारी) पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यात ढगाळ हवामानाची (Cloudy Weather) नोंद झालीय. सकाळपासूनच या भागामध्ये ढगाळ हवामान आहे. त्यामुळे आगामी 2 ते 3 तासामध्ये या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. त्याचबरोबर उद्या (शनिवारी) महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. (Maharashtra Rains)
Parts of North Maharashtra, including Pune and around may see drop in minimum temperature from 23 Jan onwards for couple of days, as per the forecast issued by IMD and also as per IMD GFS model guidance.
Watch for updates please pic.twitter.com/7xK3dCJqjG— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 21, 2022
उद्या (शनिवारी) मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 11 जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता (Maharashtra Rains) आहे.
रविवारी (Sunday) राज्यात पावसाचा वेग कमी होणार आहे.
दरम्यान, त्यादिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांत पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
त्याचबरोबर 23 जानेवारीनंतर पुण्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत थंडी (Cold) वाढण्याची शक्यता आहे.
हा थंडीचा जोर आगामी 2 दिवस कायम असणार आहे. त्यानंतर हवामान सामान्य होण्याची शक्यता आहे.
Web Title :- Maharashtra Rains | light rainfall possibilities in kokan and central maharashtra for next 3 days weather in pune and mumbai
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
SBI FD Interest Rates 2022 | फायद्याची गोष्ट ! SBI सह 3 बँकांच्या एफडीवर मिळणार जास्त व्याज
SSC HSC Exam 2022 | दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर
Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात वाढ तर, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा भाव
Comments are closed.