Maharashtra Rains | राज्यात पुढील आठवड्यापासून पाऊस बरसणार; काही भागात उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता
पुणे: Maharashtra Rains | राज्यात पावसाने उघडीप दिलेली आहे. सुरु असलेला पाऊस अचानक बंद का झाला? तसेच पाऊस कधी येणार? याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत जेष्ठ सेवानिवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. (Monsoon Rains)
सध्याचा कोकणातील सात जिल्ह्यातील मान्सूनचा जोर पाहता येत्या पाच दिवसांनंतर म्हणजे पौर्णिमेदरम्यान महाराष्ट्रासाठी नक्कीच पोषक वातावरण निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनची बंगाल शाखाही पूर्व भारतात पुढे झेपावणार आहे.
तर मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा सह्याद्रीवर चढाई करून सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षाछायेच्या प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता जाणवते. पोर्णिमेनंतर म्हणजे रविवार दिनांक २३ जून पासून मान्सूनची सक्रियता वाढून राज्यात पाऊस सुरु होईल.
अरबी समुद्रीय पश्चिमी वारे व किनारपट्टीवरील ३१०० मीटर उंचीवरला हवेतील दक्षिणोत्तर हवेच्या कमी दाबाचा आसच्या अस्तित्वामुळे मंगळवार पासून १८ ते २५ जून आठवडाभर मुंबई शहर, उपनगर , ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.
दरम्यान (१८ ते २२ जून) च्या पाच दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अश्या २९ जिल्ह्यांत मात्र केवळ तुरळक ठिकाणीच वर्तवलेल्या मध्यम पावसाचीच शक्यता ही तशीच कायम आहे. उद्या व परवा (मंगळवार व बुधवार, १८, १९ जून ला) कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर गोंदिया गडचिरोली दोन दिवस मात्र जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
दरवर्षी मान्सूनच्या आगमन व वाटचालीत त्याच्या प्रवाहात दिसणारा जून महिन्यातील कमकुवतपणा ह्यावर्षीही दिसून आला आहे. अरबी समुद्रावरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर फक्त पश्चिमी बळकट मान्सूनी वारे वाहत आहे. ह्या व्यतिरिक्त मान्सूनच्या पावसासाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रासाठी जाणवली नाही. म्हणून महाराष्ट्रात मान्सून थबकल्याचे जाणवते.
Comments are closed.