मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Maharashtra Rain Update | राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सर्वदूर पाऊस (Maharashtra Rain Update) सक्रिय झाला आहे. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur) या ठिकाणी सतत पावसाची रिपरिप दिसून येते. मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर मुंबईला पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. काल पुण्यासह मुंबईत पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांत पाणी साचल्याने (Water Lodging) नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. काल दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे सायनच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, धारावी, दादर, वडाळा, पनवेलमध्येही लोक साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत घर गाठताना दिसले. पण संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे साचलेले पाणी ओसरले. पण रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे पुन्हा सखल भागांत पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra Rain Update)
मुंबईत जोरदार सरी –
मुंबईच्या मलबार हिल परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.
वाहनचालकांना त्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. मुंबईच्या मरोळ परिसरात पावसाची संततधार सुरु आहे.
याठिकाणीही पावसाचे पाणी साचल्याचे दिसून येत आहे. कुर्ल्यात प्रचंड पाऊस झाला.
त्यामुळे पहाटे सखल भागात पाणीच पाणी साचलं आहे. रस्त्यांवरही पाणी साचलं आहे.
त्यामुळे नागरिकांना सावधगिरीने रस्त्यावरून जावे लागत आहे. वाहनचालकांनाही संथगतीनं वाहने पुढे न्यावी लागत आहेत.
Web Title :- Maharashtra Rain Update | heavy rain overnight in mumbai and pune
हे देखील वाचा :
जाणून घ्या SBI Zero Balance सेव्हिंग अकाउंटचे फायदे