Maharashtra Politics | ’50 खोक्के आणि नागालँड ओक्के’वरुन विधानसभेत गोंधळ, मुख्यमंत्र्यांची सभागृहात डायलॉगबाजी

Maharashtra Politics | tu tu mai mai in the assembly on 50 boxes nagaland okke cm shinde removed the pinch to ajit pawar

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन Maharashtra Politics | राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सध्या सुरू आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्यांवरुन आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच नुकत्यात झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीच्या (Nagaland Assembly Election) निकालानंतर राष्ट्रवादीने (NCP) भाजपप्रणीत (BJP) आघाडीला पाठिंबा दिल्याने सत्ताधाऱ्यांच्या हातात (Maharashtra Politics) आयते कोलीत आल्याचं बोललं जात आहे. याचे पडसाद आज विधानसभेत उमटल्याचे पाहायला मिळालं. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित होताच संतापलेल्या अजित पवारांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

50 खोक्के आणि नागालँड ओक्के

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने फक्त मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलाय. बदलाचे वारे कसे वाहायला लागलेत पहा, मला वाटतंय नगालँडमध्येही 50 खोके, बिल्कुल ओके… असं झालंय का? असा सवाल करत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एकीकडे आम्हाला जातीवादी सरकार (Maharashtra Politics) म्हणून आरोप करायचे आणि तिकडे मांडीला मांडी लावून बसायचं, त्यामुळेच आमचा सवाल आहे, 50 खोक्के आणि नागालँड ओक्के, असं झालंय का? असं गुलाबराव पाटील यांनी प्रश्न विचारला. यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले.

 

अजित पवार संतापले

गुलाबराव पाटील यांनी नागालँड निवडणुकीचा मुद्दा उपस्थित करताच अजित पवार चांगलेच संतापले. मंत्री महोदयांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. गुलाबराव पाटलांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायला हवं असं नाही. राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना. ही कुठली पद्धत काढली? तुमच्या हातात आहे ना? मग करा ना चौकशी. कारण नसताना कुणावरही कसलेही आरोप का करताय? असा सवाल अजित पवार यांनी केला.

 

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आम्ही केवळ मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला.
पण, हा कसला पाठिंबा, हे सगळं सोयीचं झालं. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून,
असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांना खोचक टोला लगावला.
तसेच, 2014 साली महाराष्ट्रातही तुम्ही न मागता भाजपला पाठिंबा दिला होता.
त्यामुळे, शिशे के घर मे रहनेवाले, दुसरों के घर पत्थर नही फेका करते,
अशी डायलॉगबाजीही मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : Maharashtra Politics | tu tu mai mai in the assembly on 50 boxes nagaland okke cm shinde removed the pinch to ajit pawar

 

हे देखील वाचा :

Khamgaon Jalna Railway Line Project | खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले सरकारचे अभिनंदन