मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Politics | राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन राज्यातील राजीकीय वातावरण (Maharashtra Politics) चांगलेच तापले आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाईची मागणी केली आहे. आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन सत्तार यांना मंत्रिमंडळातून (Cabinet) बडतर्फ करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मंत्री अब्दुल सत्तार यांनी चुकीच्या शब्दात वक्तव्य करुन आपले स्तर जाहीर केले आहेत. महाराष्ट्रभर आज त्यांचा निषेध केला जात आहे. त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे यासाठी आम्ही आज राज्यपाल यांना विनंती केली, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
@NCPspeaks च्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विद्यमान कृषिमंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे महामहिम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.#NCP pic.twitter.com/JBo75xc73S
— NCP (@NCPspeaks) November 8, 2022
जयंत पाटील पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे. राज्याच्या
(Maharashtra Politics) संस्कृतीला छेद देण्याचे काम सुरु आहे. लोकसभेत धडाडीने काम करणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी ही घटना घडली आहे, त्यामुळे आता आम्ही राज्यभर निषेध व्यक्त करणार आहे, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) हे महिलांविरोधी आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच सत्तार यांना बडतर्फ करण्याची मागणी आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने केली आहे. जबाबदार व्यक्तीने बोलताना भान ठेवले पाहिजे. राज्यपाल आता याविरोधात कारवाई करतील, असंही जयंत पाटील म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
औरंगाबादमध्ये एका मराठी वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न
विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील
खोके म्हणून तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार
यांना विचारण्यात आले. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली.
‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’ असं उत्तर सत्तार यांनी दिलं.
Web Title :- Maharashtra Politics | the state government is anti women jayant patal criticizes shinde fadnavis government
हे देखील वाचा :
India vs England | सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर भारताचा विजय नक्की! ‘हे’ आहे कारण
Pune Crime | वारजे माळवाडीत स्पाच्या नावावर वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेची ‘रेड’