मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Politics | मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सरकारमधील दोन मंत्री सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांची विधाने आणि त्यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकांमुळे त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर सामना अग्रलेखातून टीका केली गेली आहे. हे कसले महानाट्य? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळबद्री प्रयोग (Maharashtra Politics) आहे, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या दोन मंत्र्यांना हाकला, नाहीतर महाराष्ट्राच्या महानाट्याची चौथी घंटा वाजणार आहे. अब्दुल सत्तार महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात दखल घेण्याच्या लायक माणूस नाही. मराठवाड्यातील सिल्लोडचा हा बेडूक इकडून तिकडे आपल्या सोयीनुसार उड्या मारत असतो. त्यांच्या तोंडातून नेहमीच गटाराचा मैला वाहत असतो. महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेस हे शोभणारे नाही. अब्दुल सत्तार यांच्या गलिच्छ आणि बेशरम वक्तव्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली जात आहे. तसेच गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाच्या (Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना ‘नटी’ म्हंटले होते. त्यांचा देखील समाचार सामनाने घेतला आहे. जळगावचे खोकेबाज टाईट मंत्री गुलाबराव पाटील यांचा तोल जात नाही, तर झोकांड्या जाताना दिसत आहेत. शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख या खोकेबाजाने नटी असा केला आहे. ‘नटी’ हा शब्द त्यांनी कोणत्या अर्थाने वापरला, याचा त्यांनी खुलासा करावा, असे सामनातून म्हंटले आहे. (Maharashtra Politics)
तसेच महिलांचा अपमान करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात गळे घालून मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे (Shirkant Shinde) सिल्लोडमध्ये फिरत आहेत.
परंतु त्यांनी सत्तारांनी कोणता घाण शब्द वापरुन सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा अपमान केला,
याबद्दल काही माहीत नाही, असे ते सिल्लोडमध्ये त्यांच्या पाहूणचारात रमले आहेत.
महाराष्ट्रात कोणत्या हैवानांचे राज्य आले आहे, ते यावरुन दिसते, असे सामनातून म्हंटले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Politics | shivsena saamana editorial targets eknath shinde govenment minister abdul sattar gulabrao patil comment supriya sule sushma andhare
हे देखील वाचा :
Sanjay Raut | संजय राऊत इज बॅक, ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; अखेर जामीन अर्ज मंजूर
Pune Crime | रिव्हर्स घेताना कार घातली अंगावर; डॉक्टर महिलेवर गुन्हा दाखल