Maharashtra Politics | काँग्रेससोबत शरद पवारांनी केलेली गद्दारी नव्हती का?, शिंदे गटाच्या नेत्याचा सवाल
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Politics | अजित पवार (Ajit Pawar) यांची टीका म्हणजे स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. अजितदादा 23 नोव्हेंबरच्या पहाटेच्या शपथविधीला (Oath Ceremony) दात न घासताच गेले होते कारण त्यांना घाई होती, असं एका राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्याने मला (Maharashtra Politics) सांगितलं. त्यांनी जो उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी केला ती गद्दारी होती की शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) केलेला उठाव होता, असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते (Shinde Group Spokesperson) नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी अजित पवारांना विचारला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आम्हाला अजितदादांचे पुतळे जाळायला सांगितले
नरेश म्हस्के पुढे म्हणाले, ज्यावेळी अजित पवार यांनी पहाटे शपथविधी केला त्यावेळी जे स्वत:ला पवारांचे पुत्र म्हणतात त्यांनी आम्हाला फोन करुन अजितदादांचे पुतळे जाळा असा फोन केला होता. ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळे जाळले. मग अजित पवारांनी जे केले त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांचे पुतळे जाळले का? आपण काय केलंत? पहाटेचा शपथविधी केला त्याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी करणं आवश्यक असल्याचे म्हस्के म्हणाले. (Maharashtra Politics)
ती शरद पवारांची गद्दारी नव्हती का?
10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. आम्ही काँग्रेसपासून (Congress) वेगळे आहोत असं पत्र शरद पवारांनी लिहिलं होतं. ती गद्दारी नव्हती का?, जर आमची गद्दारी होती तर काँग्रेससोबत शरद पवारांनी केलेली गद्दारी नव्हती का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांच्या विचारांवर पक्ष वाढवला. मुळात शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊतांच्या (Sanjay Raut) खांद्यावर बंदूक ठेऊन राष्ट्रवादीने केला असल्याचा गंभीर आरोप म्हस्के यांनी केला.
बंड नाही तर उठाव केला
ग्रामीण भागात शिवसैनिकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लढून पक्ष वाढवला.
त्या शिवसैनिकांना संपवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले.
त्यामुळे शिवसेना टिकवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केले नाहीतर
उठाव केला असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राऊत सकाळी भुंकण्याचे काम करतात
एकनाथ शिंदे यांची सभा, त्यांची कारकिर्द, लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून संजय राऊत (Sanjay Raut)
यांचे मानसिक संतूलन बिघडलं आहे. संजय राऊतांचा बोंगा सकाळी सुरु होतो.
त्यांना कोण विचारतंय? फक्त सकाळी भुंकणे हेच राऊत करतात. लोकांसाठी काय केलं?
असा प्रश्न नरेश म्हस्के यांनी राऊतांना विचारला आहे.
Web Title :- Maharashtra Politics | shinde group leader naresh mhaske criticized ajit pawar and ncp
हे देखील वाचा :
Comments are closed.