Maharashtra Politics News | राज्याच्या राजकारणात काय घडतंय? शरद पवार गटाच्या दोन नेत्यांनी घेतली अजित पवारांची भेट, रोहित पवार म्हणाले – ” बरेचसे आमदार…”

नागपूर: Maharashtra Politics News | राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यानंतर आज आमदार रोहित पाटील (Rohit Patil MLA) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र सलील देशमुख (Salil Deshmukh) यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता चर्चांना अधिकचं बळ मिळालं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटात नेमकं चाललंय काय? अशीही चर्चा होऊ लागली आहे.
दरम्यान आता या भेटींवर आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, ” बरेचसे आमदार काय? काल मी देखील अजित पवार यांना भेटलो. आता अजित पवार सत्तेत आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत. मग असे काही विषय असतात ते राजकीय नसतात पण विकासाचे असतात. ते विषय मार्गी लावायचे असतील तर मग सत्तेत असणाऱ्या लोकांना आपल्याला भेटावं लागतं “, असं रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
ते पुढे म्हणाले, ” आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल भेटलो. समजा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली तर त्यांच्याकडे आम्ही मतदारसंघाचे काही विषय किंवा राज्याचे काही विषय मांडू शकतो. त्यामध्ये राजकारण करू नये.
मात्र आज दुर्देवाने त्याचे राजकारण केले जाते. आम्ही विरोधात असलो तरी मतदारसंघासाठी प्रयत्न करावे लागतात. त्याची वेगळी चर्चा होणं योग्य नाही. अजून पाच वर्ष त्यांच्याकडे २२२ आमदार आहेत, त्यामुळे आमच्या सारख्यांची गरज त्यांना असेल असं वाटत नाही”, असेही रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
Comments are closed.