मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Politics News | ठाण्यात ठाकरे गटाच्या (Thackeray Group) महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाण्यात येऊन महिलेची चौकशी केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर (State Government) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख ‘फडतूस गृहमंत्री’ असा केला. ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन राज्यातील भाजपचे (BJP) नेते आक्रमक झाले आहेत. भाजपचे आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर देताना आमचे गृहमंत्री ‘फडतूस’ नाही ‘काडतूस’ आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. आमचे गृहमंत्री ‘फडतूस’ नाही ‘काडतूस’ आहेत! मागील अडीच वर्षात ठाकरे सरकारचा (Thackeray Government) फडतूस कारभार महाराष्ट्राने पाहिला आहे. कोणत्याही मरहाणीचं समर्थन होऊ शकत नाही, आम्ही ते करणारही नाही. पण अशा खूनशी कारभाराची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनीच रोवली.
आमचे गृहमंत्री "फडतूस" नाही "काडतूस" आहेत!
मागील अडीच वर्षात ठाकरे सरकारचा फडतूस कारभार महाराष्ट्राने पाहिला.
कोणत्याही मारहाणीचे समर्थ होत नाही, आम्ही ते करणारही नाही.
पण या अशा खुनशी कारभाराची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात मा. उध्दव ठाकरे यांनीच रोवली.
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 4, 2023
निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांचा डोळा फोडण्यापासून, पत्रकारांना घरात घुसून अटक करण्यापर्यंत, लोकांची घरे तोडणे, खोटे गुन्हे दाखल करणे, केंद्रीय मंत्र्यांना अटक करणे, हे फडतूस उद्योग कुणी केले उध्दवजी? आम्ही त्याचवेळी हे सांगत होतो की कद्रु मनाने फडतूस कारभाराचे जनक होऊ नका, असंही आशिष शेलार यांनी म्हटले.
निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांचा डोळा फोडण्यापासून, पत्रकारांना घरात घुसून अटक करण्यापर्यंत, लोकांची घरे तोडणे, खोटे गुन्हे दाखल करणे, केंद्रीय मंत्र्यांना अटक करणे…
हे फडतूस उद्योग कुणी केले उध्दवजी?
आम्ही त्याचवेळी हे सांगत होतो की कद्रु मनाने फडतूस कारभाराचे जनक होऊ नका!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 4, 2023
तोंड सांभाळून बोला उद्धवजी
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तोंड सांभाळून बोला उद्धव ठाकरेजी,
असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना
दिला आहे. अडीच वर्षांत तुमची फडतूस कामगिरी महाराष्ट्रातील जनतेनं पाहिली आहे.
पालघर साधू हत्याकांड ते 100 कोटी वसुली प्रकरणात तुम्ही काय केलं हे जनता विसरली नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मा. @Dev_Fadnavis जी यांच्यावर टीका करताना तोंड सांभाळून बोला उद्धव ठाकरेजी!
अडीच वर्षांत तुमची फडतूस कामगिरी महाराष्ट्रातील जनतेनं पाहिली आहे. पालघर साधू हत्याकांड ते 100 कोटी वसुली प्रकरणात तुम्ही काय केलं हे जनता विसरली नाही.#FadtusUddhav
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 4, 2023
Web Title :- Maharashtra Politics News | ashish shelar allegations on uddhav thackeray navy officers eye break fadtus comment on devendra fadnavis
हे देखील वाचा :