मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानभवनात साकारण्यात आलेल्या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics) ठाकरे गटातील आमदारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हे तैलचित्र अजुन सुंदर बनवता आले असते. असे म्हणत ठाकरे गटाने यावर आपला आक्षेप नोंदविला आहे. ठाकरे गटातील आमदार याबाबत एक पत्र विधानसभा अध्यक्षांना लिहिणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे. (Maharashtra Politics)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
स्वर्गीय हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असून देखील ते नेहमीच पडद्यामागे राहिले. त्यांनी शेकडो लोकांना आपल्या पक्षाचा आमदार व खासदार केले पण ते स्वतः कधीही कुठल्याही पदाच्या लालसेत दिसले नाहीत. त्यातच त्यांच्या महाराष्ट्रातील राजकारणातील उल्लेखनीय कामकाजाचा गौरव म्हणून त्यांचे तैलचित्र विधीमंडळात लावण्यात येणार आहे. (Maharashtra Politics)
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती असते त्याचेच औचित्या साधत हे तैलचित्र विधीमंडळात लावण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सध्या कमालीची बदलली आहे. एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात बंडाळी घडवून आणली. त्यानंतर बाळासाहेबांच्या नावावर या दोन्ही गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे कधीही एकाच मंचावर आले नाहीत. (Maharashtra Politics)
तसेच या तैलचित्राच्या अनावरणासाठी हे दोन्ही नेते एकाच मंचावर दिसले जाणार आहेत. अशी चर्चा आहे.
एकीकडे बाळासाहेबांचे रक्ताचे वारसदार आणि दुसरीकडे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार असे चित्र निर्माण
करून दोन्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून जोरदार स्पर्धा सुरू आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा सांगत भाजपसोबत शिंदे गटाने युती केली.
मात्र आता बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणाप्रसंगी हे दोन्ही नेते एकत्र दिसू शकतात.
यासंदर्भातील निमंत्रण विधीमंडळाकडून सर्वच पक्षांच्या पक्षप्रमुखांना देण्यात येणार आहे.
त्यामुळे आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना हे दोन्ही नेते एकमेकांसमोर येणार का?
अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra Politics | controversy over balasaheb thackeray painting displeasure of thackeray group mlas over oil painting
हे देखील वाचा :
Ramdas Kadam | रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले…
Pune NCP News | राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या स्वराज्य ते सुराज्य रॅलीला उत्तम प्रतिसाद