पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Police Recruitment | राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड या गटाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेकरीता (SRPF Bharti 2022 – 2023) प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी https://www.maharashtrasrpf.
रिक्त असलेल्या ७१ पदांकरीता मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्याआधारे १:१० या प्रमाणात ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना याबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास कार्यालयाच्या srpfgr5@rediffmail.com ई-मेल आयडीवर लेखी स्वरुपात किंवा समादेशक कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथे प्रत्यक्षरित्या हजर राहून ३१ जानेवारी २०२३ रोजी ५ वाजेपर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. (Maharashtra Police Recruitment)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२११७-२६२३४७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंडच्या समादेशक विनीता साहू यांनी दिली आहे. (Maharashtra Police News)
Web Title :- Maharashtra Police Recruitment | SRPF Group No.5 Daund Armed Police Recruitment ! Released list of eligible candidates for written test; Deadline for filing objections is 31st January
हे देखील वाचा :
Maharashtra Politics | वरळीत आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश