Maharashtra Police News | काय सांगता ! होय, पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे (PhonePe) वरून वसुली (Hafta Vasuli), वरिष्ठांनी केली कडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Police News | पोलिस दल कर्तव्यदक्ष असतं म्हणून सर्वसामान्य सुरक्षित असतात. अनेक पोलिस अधिकारी, अंमलदार कर्तव्य बजाविण्यात कसलीही कुसर करत नाहीत. मात्र, बोटावर मोजण्याइतके पोलिस भ्रष्टाचार करण्यात तरबेज असतात. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar Police) पैठण तालुक्यात घडला आहे. एका पोलिस कर्मचार्याने गुटख्याचा हप्ता (Hafta Vasuli) म्हणून चक्क फोन पे वर 25 हजार रूपये घेतले (Policeman Taking Bribe Via PhonePe) . त्याबाबतच्या तक्रारी पोलिस अधीक्षकांकडे गेल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी लागलीच प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून संबंधित पोलिस अंमलदारावर निलंबनाची (Chhatrapati Sambhaji Nagar Policeman Suspended) कारवाई केली आहे. (Maharashtra Police News)
सचिन भूमे (Police Sachin Dhume) असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया (IPS Manish Kalvania) यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. पैठण येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील (Paithan SDPO) पोलिस अंमलदार हे नागरिकांना धमकावुन त्यांच्याकडून मोठया प्रमाणावर पैशांची वसुली करत असल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाली होती. त्यातच पोलिस अंमलदार सचिन भूमे यांनी काही दिवसांपूर्वीच गुटख्याचा हप्ता म्हणून फोन पे वरून 25 हजार रूपये घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना कळाली. (Maharashtra Police News)
प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिस अंमलदार सचिन भूमे यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले. सचिन भूमे हे पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकात कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे सर्वच ठिकाणच्या धंद्यांवर लक्ष होते. त्यांनी गुटखा माफियाला कारवाईची धमकी देत त्यांच्याकडून 25 हजार रूपये फोन पे व्दारे वसुल केले. शेवटी वरिष्ठांना समजल्यानंतर त्यांना निलंबीत करण्यात आले आहे. एका पोलिस अंमलदाराने फोन पे व्दारे वसुली केल्याने हा नवीन ट्रेंड समजला जात आहे. दरम्यान, सचिन भूमेंच्या निलंबनामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
Web Title : Maharashtra Police News | What does it say ! Yes, police officer’s chuck PhonePe recovery Hafta Vasuli, seniors took strict action
Comments are closed.