नालासोपारा : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Police News | नालासोपारा पोलीस ठाण्यातील (Nalasopara Police Station) पोलीस कर्मचार्याचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याने पोलीस दलात (Maharashtra Police News) खळबळ उडाली आहे. कर्मचार्याच्या मृत्यूमुळे पोलिसांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली आहे. महेंद्र मस्के (वय, 34) असं या पोलीस कर्मचार्याचे नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अधिक माहितीनुसार, महेंद्र मस्के (Mahendra Muske) हे पूर्वी वसई कोर्टात (vasai court) काम करत होते. रविवारी रात्री पोलीस कर्मचारी, न्यायालयातील कोर्ट कारकून, शिपाई मित्रांबरोबर सर्व मिळून कामण येथील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवताना श्वसन नलिकेमध्ये अन्न अडकल्याने श्वास घेण्यास त्रास झाल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तात्काळ डॉक्टरांनी तपासण्या करून ऑक्सिजन लावला, मात्र उपचारादरम्यान कर्मचार्याचा मृत्यू झाला.
या दरम्यान, रात्री त्याचा मृतदेह रिद्धिविनायक हॉस्पिटलच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला.
सोमवारी (26 जुलै) सकाळी शवविच्छेदन करण्यासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये मृतदेह पाठवून जळगाव (Jalgaon) येथील मूळ गावी त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत.
त्यांच्या पश्चात दोन लहान मुली, पत्नी असा परिवार आहे.
शांत, सदैव हसरा आणि मनमिळावू स्वभावाचा महेंद्र मस्के (Mahendra Muske) यांच्या अचानक जाण्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलिसांना दुःख अनावर झालं आहे.
Web Title :- Maharashtra Police News | policeman dies after food gets stuck respiratory tract while eating
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अर्ज