मुंबई :बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Police | मुंबईचे पोलिस आयुक्त हेंमत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale) यांनी पोलिस अधिकारी-कर्मचा-यांना चांगलंच सुनावले आहे. वर्दीत असताना तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही पिचका-या मारलेल्या, धूम्रपान केलेले चालणार नाही. शरीरयष्टीला शोभेल असा स्वच्छ व नीटनेटका गणवेश परिधान केलाच पाहिजे, अशा सुचना पोलिस आयुक्त नगराळे यांनी अधिकारी-कर्मचारी (Maharashtra) वर्गाला दिल्या आहेत.
आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले की, डय़ुटीवर असताना काही पोलीस अधिकारी-अंमलदार अर्धवट गणवेश (Maharashtra Police) घालून वावरताना दिसतात.
तसेच बरेच अधिकारी-अंमलदार कॅप घालत नाही तसेच घातलीच तर ती व्यवस्थित घातलेली नसते. इतकेच नाही तर बरेच वेळा सार्वजनिक ठिकाणी गणवेशात असताना काही अधिकारी-अंमलदार (Police officers-staff) तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही थुंकताना सर्रास दिसतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवाय धूम्रपान करतानाही आढळून येतात.
या सर्व बाबींमुळे आपण जनमाणसात पोलीस दलाची प्रतिमा मलिन करीत असतो असे निदर्शनास आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या सर्व गोष्टी अत्यंत गंभीर असल्याने यापुढे असा बेजबाबदारपणा चालणार नाही, तंबाखू, गुटखा खाऊन, धूम्रपान करून आपण पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याबरोबर आपले स्वास्थदेखील धोक्यात घालत असतो.
त्यामुळे ही वाईट सवय असून ती तत्काळ थांबवा, डय़ुटीवर असताना स्वच्छ, नीटनेटका व शरीरयष्टीला शोभेल असा गणवेश परिधान करावा, कॅप व्यवस्थित घालावी.
असं पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अधिकारी-कर्मचा-यांना सुनावले आहे.
Web Title : Maharashtra Police | Mumbai CP Hemant Nagrale instructions to police officers staff about Tobacco and Gutkha.
Dhule Zilla Parishad Election | धुळ्यात महाविकास आघाडीला दणका ! चंद्रकांत पाटलांच्या मुलीची ‘बाजी’
Kolhapur Anti Corruption | वीज जोडणीसाठी लाच मागणाऱ्या अभियंत्यासह एकजण अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात