मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. राज्याला देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य यंत्रणेचे जसे मोठे योगदान आहे. तसे पोलीस दलाचे देखील मोठे योगदान आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी पोलिसांनी स्वत:ला या लढाईत झोकून दिले आहे. मात्र नागरिकांचे संरक्षण करत असताना पोलीस कोरोना संक्रमित होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील चार महिन्यात तब्बल 95 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तरुण पोलिसांच्या मृत्यूने चिंता वाढली
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी होताना पहायला मिळत नाही. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे पोलीस कर्माचारी संक्रमित होत आहेत. तर काही पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोनामुळे तरुण पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू होत असल्याने पोलिस दलाची चिंता आणखी वाढली आहे.
आजपर्यंत 427 पोलिसांचा मृत्यू
देशामध्ये मार्च 2020 पासून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. देशात कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून पोलीस अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावत असताना कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने पोलीस कोरोना संक्रमित होत आहेत. तर काही जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 427 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 2020 मध्ये 332 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या चार महिन्यात तब्बल 95 पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक मृत्यू एप्रिल 2021 मध्ये
डिसेंबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र, फेब्रुवारीपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली. मार्च महिन्यात याचे प्रमाण वाढले तर एप्रिलमध्ये रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ झाली. एप्रिल महिन्यात तब्बल 64 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मे महिन्याच पहिल्याच आठवड्यातील दोन दिवसांत 5 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू होणाऱ्यांमध्ये तरुण पोलिसांची संख्या जास्त असल्याने पोलीस दलासमोर नवा प्रश्न उपस्थित झाला आहे.
चार महिन्यातील पोलिसाचे मृत्यूचे प्रमाण
जानेवारी – 12 पोलिसांचा मृत्यू
फेब्रुवारी – 2 पोलिसांचा मृत्यू
मार्च – 12 पोलिंसांचा मृत्यू
एप्रिल – 64 पोलिसांचा मृत्यू
मे* (2 दिवस) – 5 पोलिसांचा मृत्यू