Maharashtra Omicron variant | महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Omicron variant | दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने अनेक देशात शिरकाव केला आहे. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मागील कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर आता ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव झाला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. तर, महाराष्ट्रात (Maharashtra Omicron variant) फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.
देशातील 12 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे 200 हून जास्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron variant) सर्वाधिक आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 77 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले की, ‘टास्क फोर्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात फेब्रुवारीत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्याने त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाबाबतचे नियम पाळणं गरजेचं आहे,’ असं आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. (Maharashtra Omicron variant).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉन व्हेरिएंटचीच (Omicron variant) असेल. पण त्याबाबत फार घाबरण्याची गरज नाही कारण ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये हॉस्पिटलाईज होण्याचे प्रमाण फार कमी आहे. परंतु, असं असलं तरी नाताळ आणि नववर्ष साजरं करताना काळजी घ्यावी.
Web Title :- Maharashtra Omicron variant | Covid task force estimates increase omicron patients maharashtra february health minister.
Pune Crime | दारु पिण्यास अटकाव केल्याने डोक्यात फोडली बिअरची बाटली; चतुःश्रृंगी परिसरातील घटना
Comments are closed.