Maharashtra NCP Crisis | पक्षातील बंडखोरीनंतर शरद पवार अॅक्शन मोडवर, ‘हा’ आमदार टार्गेट; 8 तारखेला मतदारसंघात घेणार सभा
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra NCP Crisis | अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन दिवसांपूर्वी बंडखोरी केल्यामुळे पक्षात फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर (Maharashtra NCP Crisis) राष्ट्रावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पुन्हा पक्षाची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे जाहीर करत बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षातील बंडखोरीनंतर (Maharashtra NCP Crisis) शरद पवार यांनी डॅमेज कंट्रोल कमी करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचबरोबर शरद पवार यांचा महाराष्ट्राचा दौरा ( Maharashtra Daura) नाशिकमधून सुरु होणार आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघात येत्या 8 तारखेला शरद पवार यांची सभा होणार आहे. येवला येथे पवारांची पहिली सभा होणार आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या निशाण्यावर छगन भुजबळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, येवल्यातील भुजबळ यांचे एकेकाळी खंदे समर्थक असलेले आणि आत्ताचे विरोधक अॅड. माणिकराव शिंदे (Adv. Manikrao Shinde) यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. येवल्यातील छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची महाराष्ट्रातील पहिली सभा मार्केटयार्ड येथे होणार असल्याची माहिती अॅड. शिंदे यांनी दिली आहे. लढू आणि जिंकू अशी पवारांच्या सभेची घोषणा असणार असल्याचे, शिंदे यांनी सांगितले.
अॅड. माणिकराव शिंदे यांची 2019 मध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात काम केल्यामुळे पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
मात्र छगन भुजबळ हेच पवारांच्या विरोधात गेल्याने आज त्यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. अॅड. शिंदे हे राष्ट्रवादीचे जुने नेते म्हणून ओळखले जातात.
Web Title : Maharashtra NCP Crisis | first target chhagan bhujbal sharad pawar will hold a meeting preparations of bhujbals opponents
Comments are closed.