मुंबई बहुजननामा ऑनलाईन – आर्थिक मागास विद्यार्थ्यांना मुंबईत शिक्षणासाठी आल्याने त्यांना राहण्याची व्यवस्था नसल्याने ते मागे पडत होते. याचा विचार करून राज्यातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी मुंबईत मुलांसाठी पहिले वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजने अंतर्गत हे वसतिगृह सुरू होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीवेळी वसतिगृहाची मागणी केली होती त्यानंतर राज्य सरकारने मागास विद्यार्थ्यांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतिगृह बांधण्याचे आश्वासन दिले होते. मुंबईत आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी ७१ खोल्यांचे वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. त्याची कायदेशीर पूर्तता करण्यात आली आहे. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानकडे या वसतिगृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबईतील वडाळा रेल्वे स्थानकाजवळ ७१ खोल्यांचे हे वसतिगृह सूरू करण्यात येणार आहे. या वसतिगृहाचं काम अंतिम टप्प्यात आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालीय. या वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. वसतिगृहामध्ये महिन्याला १ हजार रूपये एवढी कमी फी यासाठी आकारण्यात येणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानकडे संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलंय.