Maharashtra Monsoon Update | आगामी 2 दिवसांत मोसमी पाऊस कोकणात; ‘या’ दिवशी मुंबईत बरसणार – IMD

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाची (Monsoon) चर्चा आहे. यंदा मोसमी पावसाचे लवकर आगमन होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) वर्तवला आहे. त्यानुसार आता सध्या मोसमी पाऊस केरळात (Kerala) हजर झाला आहे. यानंतर आता आगामी दोन दिवसामध्ये तो कोकणात (Konkan) दाखल होण्याची (Maharashtra Monsoon Update) शक्यता आहे. अनुकूल वातावरण असल्याने दोन दिवसामध्ये गोवा (Goa) आणि दक्षिण कोकणामध्ये (South Konkan) मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे. मुंबईकरांना (Mumbai) मात्र मोसमी पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, कर्नाटकचा आणखी काही भाग,कोकण-गोव्याचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग,नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग,प.म. बंगालचा उपसागर,ई. बंगालचा उपसागर, ईशान्य राज्ये,SHWB,सिक्कीम पुढील 2 दिवसांत जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 1, 2022
हवामानाच्या अंदाजानुसार, मोसमी पाऊस मुंबईत 10 जूननंतरच येईल. दरम्यान, देशाच्या बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी 106 टक्के पाऊस अपेक्षित आहे, त्याचबरोबर उत्तर-पूर्व भागामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. नैऋत्य मान्सून 1 जून रोजी नियोजित वेळेच्या 3 दिवस आधी रविवारी केरळमध्ये पोहचण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली होती.
“नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात आहे. कर्नाटकचा आणखी काही भाग, कोकण-गोव्याचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, बंगालचा उपसागर, ई. बंगालचा उपसागर, ईशान्य मधील राज्ये, सिक्कीममध्ये पुढील दोन दिवसांत जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.’ अशी माहिती हवामान तज्ञ के एस होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिली आहे.
Web Title :- Maharashtra Monsoon Update | maharashtra rain update monsoon news india kerala konkan mumbai rain marathi news
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
ATM Cash Withdrawal | एटीएममधून कॅश काढताना ‘या’ लाईटकडे आवश्य ठेवा लक्ष, अन्यथा रिकामे होईल अकाऊंट
Comments are closed.