मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Maharashtra Monsoon Update | उद्यापासून मुंबई (Mumbai) आणि उपनगरात पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. तसेच पुढील एक ते दोन दिवसांत पुणे (Pune) आणि परिसरातील पावसाचा (Maharashtra Monsoon Update) जोर वाढणार आहे. याशिवाय कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढील दोन दिवसांमध्ये कोल्हापूर (Kolhapur) आणि सातारा (Satara) परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकूणच पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात चांगल्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. परंतु मान्सूनने आतापर्यंत राज्यात दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. राज्यात केवळ एक टक्काच पेरणी झाली आहे. तर दुसरीकडे धरणांमधील पाणी साठी कमी होत असल्याने पाणी संकट पहायला मिळत आहे. (Maharashtra Monsoon Update)
18 Jun,आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून,काही ठिकाणी मध्यम ते जोरधार पावसाची शक्यता तसेच म.महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भातही
द.कोकणात सोमवार पासून अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाण्यासह उ.कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Latest Satellite obs confirms status now pic.twitter.com/jqjgKYsiq0— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 18, 2022
मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी हवामानातील बदलामुळे (Climate Change) मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर अडकला. जूनच्या मध्यापर्यंत राज्यात कोरडे वातावरण होते. मात्र, पुढील 24 तासात महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून येत्या 24 तासात काही ठिकाणी मुसळधार तर अतिमुसळधार पवासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अन्यथा दुबार पेरणीचे संकट येऊ शकते
राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये.
पेरणीची घाई करु नये असे मत कृषी विभाग आणि तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.
जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे धोकादायक ठरु शकते.
तसेच दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
Web Title :- Maharashtra Monsoon Update | maharashtra monsoon updates heavy rain expected in mumbai konkan and central maharashtra in two days
हे देखील वाचा :
Raju Shetty | सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मगाणारा हॉटेलवाला माझा कार्यकर्ता; राजू शेट्टींचा खुलासा
Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण; पाहा आजचा भाव किती ?