अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra MLC Elections 2022 | सहा जागेसाठी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections 2022) आणि दहा जागेसाठी विधान परिषद निवडणूकीच्या (Maharashtra MLC Elections 2022) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आज (बुधवारी) भाजपकडून (BJP) विधान परिषदेसाठी उमेदवारी जारी करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर (Praveen Darekar), प्रसाद लाड (Prasad Lad), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiya), राम शिंदे (Ram Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये राम शिंदे यांना उमेदवारी दिल्यानंतर राजकीय चर्चा चांगल्याच रंगल्या आहे.
राम शिंदे यांच्याकडे जामखेडची आमदारकी होती. मात्र 2019 च्या निवडणुकीमध्ये राम शिंदे यांना पराभव स्विकारावा लागला. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) रोहित पवार (Rohit Pawar) विजयी झाले. त्यामुळे त्या मतदारसंघात भाजपला एक मोठा धक्का बसला होता. आता भाजपने करेक्ट कार्यक्रम केला आहे. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी जामखेड मतदारसंघाचे राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. राम शिंदे यांना आता आमदारकी मिळणार असून त्या मतदार संघात भाजपचं पारडं जड होण्यास मदत होणार आहे. (Maharashtra MLC Elections 2022)
दरम्यान, राष्ट्रवादीच्या वाढणाऱ्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपने खेळी केली आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जामखेडमध्ये राष्ट्रवादीसोबत स्कोअर सेटल करण्यासाठी ही फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. नगरमधून ओबीसी चेहरा देऊन भाजपने राम शिंदे यांचं पुनर्वसन केलं आहे. त्यामुळे या उमेदवारीवरुन सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
Web Title :- Maharashtra MLC Elections 2022 | bjp selected ram shinde for mlc election 2022 to give challenge ncp mla rohit pawar
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- NEET PG 2021 | जागा रिक्त ठेवून काय मिळणार, डॉक्टरांची गरज आहे ! वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1456 जागा रिकाम्या असल्याने SC ची तीव्र टिप्पणी
- Pune Crime | नदीकिनारी विहीरीसाठी सुरुंग स्फोट केल्याने दगड उडून घरांचे नुकसान; खराडीमधील घटनेत पाण्याची टाकी फुटली, दगड लागून काही जण जखमी
- Indian Railways | रेल्वेने या मोठ्या बातमीचे केले खंडन, म्हटले – ‘विश्वास ठेवू नका, अन्यथा होईल पश्चाताप’
- Maharashtra Legislative Council Elections 2022 | विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंचा पत्ता कट ! भाजपकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर