मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे युवानेते तथा राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आली आहे. तर यामुळे आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, तसेच कोरोना टेस्ट करून घ्यावी,असे आवाहन आदित्य ठाकरे त्यांनी ट्विटरच्या माध्यमाद्वारे केले आहे.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 20, 2021
तर आदित्य ठाकरे यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आपण सर्वांनी मास्क घालावा, आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, अशी विनंती देखील आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला केली आहे.