Maharashtra Load Shedding | राज्यावर वीजसंकट ! लोडशेडिंग सुरु होणार; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Load Shedding | राज्यातील लोडशेडिंग बाबात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यावर मोठ वीजसंकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात होती. महाराष्ट्रात लोडशेडिंग (Maharashtra Load Shedding) सुरु होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत (Maharashtra Energy Minister Nitin Raut) यांनी लोडशेडिंग किंवा भारनियमन होणार नसल्याचे सांगितले होते. परंतु आज अखेर नाईलाजाने राज्य सरकारला (Maharashtra State Government) त्याबाबतचा निर्णय घ्यावा लागला. ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात आज जवळपास तीन तास बैठक झाली. या बैठकीत वीजेची कमतरेअभावी राज्यात भारनियमन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली. तसेच राज्यातील जनतेने काही दिवस संभाळून घ्यावं, असं आवाहन केलं आहे.
या ठिकाणी होणार लोडशेडिंग
ज्या ठिकाणी बिलं (Electricity Bill) भरलेली नाहीत. वसुली होत नाही. ज्या ठिकाणी वीज चोरी होते त्या ठिकाणी लोडशेडिंग (Maharashtra Load Shedding) केली जाते. G1, G2, G3 अशा सेक्टर आखत भारनियमन केलं जातं. नागरिकांनी चोऱ्या थांबवाव्यात. चोऱ्या होऊन देऊ नयेत असे राऊत यांनी सांगितले.
देशातील 9 राज्यांमध्ये लोडशेडिंग
देशातील नऊ राज्यांमध्ये लोडशेडिग केले जात आहे. त्यापैकी महाराष्ट्र एक आहे. कोरोना संपल्यानंतर वीजेची मागणी वाढली आहे. कोळसा मंत्रालयाने (Ministry of Coal) रेल्वे मंत्रालयाकडे (Ministry of Railways) बोट दाखवलं आहे. केंद्र शासनाची (Central Government) नियोजनात चूक झाली आहे. तसेच अदानी कंपनीने (Adani Company) पुरवठा कमी केला. त्यामुळे 14 हजार 005 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. CGPL ने फक्त 630 मेगावॅट पुरवठा (Supply) केला. खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही. हा तुटवडा कधीपर्य़ंत राहील याची कल्पना नाही. इम्पोर्टेड कोल घेण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. हवामान खात्याच्या (IMD) म्हणण्यानुसार, एक दोन दिवसात पाऊस पडणार आहे. पाऊस पडला तर मदत होईल आणि भारनियमन कमी होईल, अशी माहिती राऊत यांनी दिली.
राऊत यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे
– आदानी पॉवर्स कंपनीने (Adani Powers Company) 3100 मेगावॅट वीज देणं अपेक्षित होते. मात्र, त्यांनी अचानक त्यांच्या तिरोडा येथील कंपनीचा पुरवठा बंद केला. तसेच 3100 मेगावॅट वीज पुरविण्याचा करार आहे. मात्र त्यांनी आपल्याला 1795 मेगावॅट वीजेचा पुरवठा केला. त्यामुळे 1405 मेगावॅट वीजेची कमतरता भासू लागली.
– आदानी आणि GSW दोघांनाही नोटीस पाठवली आहे.
– GSW ने SLDC (State Load Dispatch Centre) परवानगी न घेता प्लांट दुरुस्तीच्या नावाखाली बंद केला. यंत्रणा चायनीज असल्याने ते येईपर्य़ंत 9 महिने लागतील.
सरकारने याबाबत चौकशी केली असता हा बनाव असल्याचे समोर आले.
– GSW ला ग्रीड connectivity खंडीत करण्याची नोटीस दिली आहे.
– Electricity Act Section 11 नुसार सरकारने अधिकाराच्या आखत्यारित ते सुरु करण्याचे आदेश देऊ शकते. या अंतर्गत अदानी आणि GSW यांना 15 दिवसांत वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. अन्यथा कारवाई होऊ शकते.
– Power Purchase Agreement रद्द केले जाऊ शकते आणि अमानत रक्कम सरकार जप्त करु शकते.
पॉवर ग्रीड ही सरकारची असल्याने इतर वीज ग्राहक जे MSEB चे नाहीत अशांचा सप्लाय रद्द होऊ शकतो.
– GSW हे MSEB ला वीज न देता खाजगी यंत्रणांना वीज देत आहेत.
– टाटा कंपनी 760 ऐवजी 630 मेगावॅट वीज देत आहे. टाटा कंपनीला (Tata Company) ताकीद दिल्यानंतर 72 तासात उरलेली 130 मेगावॅट वीज देणार आहे.
Web Title :- Maharashtra Load Shedding | Maharashtra energy minister nitin raut declare load shedding now start in maharashtra due to shortage of coal and electricity summer season
Pune NCP | ॲड. गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा; पुणे राष्ट्रवादीची मागणी
Comments are closed.