नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra-Karnataka Border Dispute | महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाल्यानंतर अखेर राज्य सरकारने विधानसभेत मांडलेला ठराव (Resolution) एकमताने मंजूर झाला आहे. कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच अन् इंच जागा महाराष्ट्राची असून सीमा भागातील (Maharashtra-Karnataka Border Dispute) मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभे असल्याचा ठराव आज विधानसभेत मांडण्यात आला. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session-2022) सुरु झाल्यापासून विरोधकांकडून सातत्याने सीमाप्रश्नावर ठराव करण्याची मागणी केली जात होती. अखेर आज ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलीली मागणी नाकारण्यात आली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra-Karnataka Border Dispute) बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सीमावादावर सभागृहात चर्चा करण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालंय. याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. कर्नाटक सरकार (Government of Karnataka) सीमाप्रश्नी आग्रही भूमिका मांडत आहे. परंतु, सीमावादावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी ब्र तरी तोंडातून काढला का? सीमाप्रश्न सुरु असताना मुख्यमंत्र्यांना दिल्ली जाण्याची गरज होती का? दिल्लीत जाऊन ते सीमावादाचा प्रश्न उपस्थित करणार आहेत का असा सवाल त्यांनी केला होता. त्यावेळी कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) एक निकाल दाखवून ही मागणी नाकराली.
सर्वांनी एकमताने ठराव मंजूर केला, याबद्दल मी सर्व विधानसभेतील सदस्यांचे आभार मानतो,
असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
यावेळी सीमाभागात जाहीर करण्यात आलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली.
कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या मराठी या शहरांसह 865
गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासंदर्भातील ठराव एक मताने विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maharashtra-Karnataka Border Dispute | maharashtra assembly winter session 2022 maharashtra karnataka border dispute resolution was presented in vidhansabha
हे देखील वाचा :