जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (Maharashtra Jeevan Pradhikaran) कार्यालयातच ऑन ड्युटी मद्यप्राशन (On duty Liquor Party) केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील (Maharashtra Jeevan Pradhikaran) शाखा अभियंता आर.आर. ठाकूर (Branch Engineer R.R. Thakur), अनुरेखक एच.के हसबन (H. K. Hasban) यांना निलंबित करण्यात आले आहे. तर करार पद्धतीवर घेतलेल्या शाखा अभियंता टी.एस. गाजरे (Branch Engineer T.S. Gajre) यांची नियुक्ती रद्द (dismissed) करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आकाशवाणी केंद्रामागे असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या या कार्यालयात मद्यपार्टी रंगल्याचा एक व्हिडिओ गुरुवारी दुपारी सोशल मीडियावर व्हायरल (video social media viral) झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये तिघांची ओळख पटल्यानंतर मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंतांनी यावर तातडीने कारवाई करीत आज (शुक्रवार) निलंबन आणि बडतर्फीचे आदेश काढले.
यामध्ये निलंबित करण्यात आलेल्या आर.आर. ठाकूर यांचे निलंबन काळात मुख्यालय नंदुरबार (Nandurbar) कार्यालय राहणार असून पूर्व परवानगी शिवाय त्यांना कार्यालय सोडता येणार नाही. तसेच खासगी नोकरीही करता येणार नसल्याचे मुख्य अभियंत्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. अशाच प्रकारे अनुरेखक एच.के. हसबन यांना अधीक्षक अभियंत्यांनी निलंबित केले आहे.
Delta Variant | चिंताजनक ! नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे 30 रुग्ण आढळले
नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी कारवाई
मद्यपान करणाऱ्यांमधील टी.एस. गाजरे हे सेवानिवृत्त असून त्यांना सहा महिने कालावधीसाठी करार पद्धतीने 2 ऑगस्टपासून शाखा अभियंता म्हणून घेतले होते. त्यानंतर लगेच 3 रोजी कार्यालयातच गाजरे यांच्यासह तिघांनी मद्यपान केले. त्यामुळे नोकरी लागून एकच दिवस नोकरी केली नाही तोच 4 ऑगस्टपासून त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली.
Web Title :- Maharashtra Jeevan Pradhikaran | both suspended and one dismissed duty liquor party case
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
MS Dhoni | … म्हणून MS धोनीच्या Twitter अकाऊंटवरून ‘ब्लू टिक’ हटवली