मुंबई न्यूज :बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra HSC Result । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education) घेण्यात असलेली 10 वी आणि 12 वीची परीक्षा राज्य शासनाच्या नियमानुसार रद्द ठरवण्यात आली. मागील काही दिवसांमध्ये 10 वीचा निकाल जाहीर झाला. आता 12 वीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना होती. त्यामुळे आता इयत्ता 12 वी बोर्डाचा (HSC Result) निकाल उद्या दुपारी 4 वाजता जाहीर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उद्या मंगळवार, दिनांक 03-08-2021 दुपारी 4 वाजता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा
निकाल जाहीर होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
(Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.
बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
विद्यार्थी https://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.12 वी (HSC Result) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या
सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील
व सदर माहितीची प्रिंट घेता येणार आहे. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील बघा.
इथे पहा निकाल –
> https://hscresult.
> www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in
Web Title : Maharashtra hsc result 2021 maharashtra msbshse will declare tomorrow at four pm class 12th result on 3rd august check at hscresult 11theadmission org in and msbshse co in