जुन्नर : बहुजननामा ऑनलाइन – अखंड भारताचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर तब्बल 20 वर्षांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेट देणार आहेत. गेल्या दोन दशकांत प्रथमच राज्याचे राज्यपाल किल्ले शिवनेरीच्या भेटीला येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी ते नतमस्तक होणार आहेत. किल्ले शिवनेरीवरील पहिल्या दरवाजापासून ते संपूर्ण गडावर ते पायी फिरून पाहणी करणार असून 3 तास ते गडावर राहणार आहेत.
राज्यपालांच्या किल्ले शिवनेरीवरील भेटीच्या शासकीय नियोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याने गडावरील राज्यपालांच्या भेटीच्या दृष्टीने विशेष खबरदारी प्रशासन घेत आहे. पावसामुळे कोणत्याही प्रकारची अडथळा राज्यपालांच्या दौर्यात किल्ले पाहणीच्या वेळात येवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे.गडावर बिबट्यांचा वावर असतो. या दृष्टीनेही खबरदारी घेण्यात यावी. झाडाझुडूपात हिंस्त्रपशू थांबणार नाहीत याची काळजी संबंधित विभागांनी घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश दौर्याच्या अनुषंगाने देण्यात आले होते.
त्याप्रमाणे प्रशासनाकडून या दौर्याचे नियोजन केले आहे. गेल्या 20 वर्षांत राज्यपालांच्या किल्ले शिवनेरी भेटीची ही पहिलीच वेळ असल्याने या भेटीला विशेष महत्व आहे. जुन्नरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रमाधाममध्ये अल्पोहार करुन ते किल्ले शिवनेरीवर जाणार आहेत. किल्ले शिवनेरीवर 3 तास भेटीच्या दौर्यानंतर ते राजभवनाकडे रवाना होणार आहेत.